
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक योजना नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची आणि सामाजिक जाणीव जागवण्याची प्रभावी चळवळ आहे, असे प्रतिपादन प्रो. डाँ. बबन मेश्राम यांनी स्व. पार्वताबाई मदनकर कला व वाणिज्य महाविद्यालय वरठी यांचे राष्ट्रीय सेवा योजना सात दिवशीय निवासी शिबिराचे समारोप प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून केले. नवनिर्माण शिक्षण संस्था जवाहरनगर द्वारा संचलित व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर सलंग्नित स्व. पार्वताबाई मदनकर कला महाविद्यालय वरठी याचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे समारोप कार्यक्रम ग्राम पांढराबोडी येथे नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बोरकर होते. तर प्रमुख वक्ते म्हणून एन. एम. डी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा रासेयो गोंदिया जिल्हा समन्वयक प्रो. डाँ. बबन मेश्राम होते. तर प्रमुख उपस्थितीत माजी जि. प सदस्य प्यारेलाल वाघमारे, मुख्याध्यापक शेंडे उपस्थित होते.
रासेयो स्वंयसेवक यांना प्राचार्य डाँ. आशिष बोरकर मार्गदर्शन करताना उत्साहपूर्ण ७ दिवसांच्या निवासी शिबिराचा सांगता समारंभ, मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात होत आहे. शिबिरा दरम्यान स्वयंसेवकांनी गावात रस्ते सफाई, वृक्षारोपण, आणि जनजागृती रॅली काढली।या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, शिस्त आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता विकसित झाली। शिबिराच्या शेवटच्या दिवशी स्वयंसेवकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्यात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाँ. मधुकर गोमासेयांनी केले तर शिबिर यशस्वी केल्याबद्दल सहभागी स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे आभार डाँ. शिवकुमार हटवार यांनी मानले. शिबिराचे यशस्वीते करीता शिबिर प्रमुख मनोज भालेराव, डाँ. छाया देशमुख, प्रा. संगीता वखाळकर, महेश मदनकर, प्रा. विद्या ढोके, डाँ. नितीन नवखरे सह महाविद्यालयातील शिक्षेत्तर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी शिबीर प्रमुख प्रा मनोज भालेकर, प्रा छाया देशमुख, प्रा रजनी वंजारी, प्रा मंगेश काटेखाये, प्रा. मधुकर गोमासे प्रा. शिवकुमार हटवार , प्रा. संगीता वखाळकर, महेश मदनकर, प्रा विद्या ढोके, प्रा नितीन नवखरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मधुकर गोमासे तर आभार डॉ. शिवकुमार हटवार यांनी मानले