
महाराष्ट्र शासनाने सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा आणि शेतकरी, महिला व युवकांना बळ देणारा आहे. शेतकºयांसाठी कर्जमाफी, कृषी पंपांच्या वीज बिल माफीसारखे महत्त्वाचे निर्णय घेऊन शेती क्षेत्राला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’, ‘लखपती दीदी’ उपक्रम आणि एकल महिला धोरणासारख्या योजना महिलांच्या सक्षमीकरणाला नवी ताकद देणाºया ठरतील. तसेच मेट्रो, द्रुतगती मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करून राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन या अर्थसंकल्पातून दिसून येते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या आर्थिक नियोजनात दिलेल्या योगदानाची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसतो. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करेल, असा विश्वास माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला.