
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यभर विशेष एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, समाज माध्यमांवर या लसीकरण मोहिमेबाबत दिशाभूल करणारे व अफवा पसरवणारे काही व्हिडिओ प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवा व नकारात्मक प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. राज्यासह भंडारा जिल्ह्यातही आता गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध (उी१५्रूं’ उंल्लूी१) लढा देण्यासाठी ‘एचपीव्ही’ (ऌढश्) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जागतिक महिला दिनी करण्यतात आला. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केली आहेत, मात्र १५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत, अशा सर्व मुलींना ही लस शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.
महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे (उी१५्रूं’ उंल्लूी१) वाढते प्रमाण लक्षात घेता, भंडारा जिल्हा प्रशासनाने या गंभीर आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १४ वर्षे पूर्ण असलेल्या मुलींसाठी ‘एचपीव्ही’ (ऌढश्) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेबाबत माहिती देताना जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले की, “हा आजार टाळता येण्यासारखा आहे आणि वेळेवर दिलेली लस मुलींच्या भविष्यातील आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे. हे लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असून सर्व शासकीय आरोग्य केंद्रांवर मोफत उपलब्ध आहे.”
डॉ. मिलिंद सोमकुंवर (जिल्हा आरोग्य अधिकारी): “एचपीव्ही लस ही नवीन नसून जगभरात ५० कोटींहून अधिक महिलांनी ती घेतली आहे. ही लस ९३% ते १००% पर्यंत प्रभावी आहे. पालकांनी आपल्या मुलींचे नाव ‘वहकठ’ पोर्टलवर नोंदवून जवळच्या आरोग्य केंद्रात लसीकरण करून घ्यावे.” “काही पालकांमध्ये लसीच्या दुष्परिणामांबाबत गैरसमज असू शकतात. मात्र इतर लसींप्रमाणेच केवळ इंजेक्शनच्या जागी थोडे दुखणे किंवा हलका ताप येऊ शकतो, जो २-३ दिवसांत बरा होतो. या लसीमुळे भविष्यात प्रजनन क्षमतेवर कोणताही विपरित परिणाम होत नाही, उलट ती भविष्यातील आरोग्याचे रक्षण करते.” डॉ. संदीपकुमार गजभिये (जिल्हा शल्य चिकित्सक): “गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील दुसºया क्रमांकाचा मोठा आजार आहे. नियमित तपासणी आणि वेळीच लसीकरण केल्यास या आजाराचा आणि त्यातून होणाºया मृत्यूचा धोका आपण लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.”