रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडला

भंडारा पत्रिका/ वार्ताहर पालांदूर : पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता पालांदूर येथील पोलिस आपले पथकासह पट्रोलिंग करीत असताना निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व विना क्रमांकाच्या लाल रंगाच्या ट्रॉलीने चुलबंद नदीच्या पात्रातून विना परवाना विना पास रेतीची अवैद्य वाहतूक करतांना शनिवारी दि. ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता दरम्यान मिळून आल्याने ट्रॅक्टर चालक व मालकावर पालांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ९ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपींची नावे ट्रॅक्टर चालक योगेश सुखदेव नाकाडे (२५वर्ष) रा. मिरेगाव, ता. लाखनी व ट्रॅक्टर मालक भास्कर नारायण फुंडे रा.सोमनाळा ता.लाखनी असे आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील गावांत पोलिसांची पेट्रोलिंग सुरू आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव परिसरात याच पोलीस पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना सकाळी १० वाजता दरम्यान ट्रॅक्टर चालक योगेश नाकाडे विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व सोबत जोडलेली लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली व एक ब्रास रेती असा एकूण ९ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळावरून ट्रालीमध्ये अंदाजे १ ब्रास रेती भरून विनापास परवाना वाहतुक करतांना मिळुन आल्याने सदर टॅÑक्टरचे मालक आरोपी क्र.२ यांचे सांगण्यावरून त्यांचे मालकीचे टॅÑक्टरचे टॅÑाली मध्ये मौजा डोंगरगावचे शेजारी असलेल्या चुलबंद नदिपात्रातुन रेती चोरी करून रेतीची चोरटी वाहतुक करीत असल्याचे सांगीतल्याने फिर्यादी पो. हवा. ओमप्रकाश गणपत दिवठे यांच्या फिर्यादी वरून पालांदूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक योगेश सुखदेव नाकाडे रा.मिरेगाव, ता.लाखनी व ट्रॅक्टर मालक भास्कर नारायण फुंडे रा.सोमनाळा, ता.लाखनी यांचे विरुद्ध अपराध क्रमांक ६४/२०२६ कलम ३०५(ई), ४९, भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पालांदूरचे ठाणेदार सतीश बन्सोड करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *