कोका येथे मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा आणि मोहाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात मका पेरणी केली आहे. मात्र, हक्काचे खरेदी केंद्र उपलब्ध नसल्याने या पिकाची विक्री कशी करावी, असा गंभीर प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर, कोका येथे तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी भंडारा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हितेश सेलोकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकºयांसमोर विक्रीची बिकट समस्या भंडारा तालुक्यातील माटोरा, कोका, सपेर्वाडा, इंजेवाडा, दुधारा, चंद्रपूर तसेच मोहाडी तालुक्यातील खडकी, बोंडे, पालोरा,जांभोरा आणि डोंगरदेव येथील शेतकºयांनी आपल्या शेतजमिनीत मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड केली आहे. मक्याचे उत्पादन चांगले झाले असले तरी, स्थानिक पातळीवर खरेदी केंद्र नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वेळेवर विक्री न झाल्यास आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे.कोका येथे केंद्र झाल्यास सोयीचे कोका हे गाव परिसरातील अनेक गावांसाठी मध्यवर्ती ठिकाणआहे. जर या ठिकाणी मका खरेदी केंद्र सुरू झाले, तर परिसरातील सर्व शेतकºयांना आपला माल विकण्यासाठी मोठी मदत होईल. शेतकºयांचा माल वेळेवर विकला जावा आणि त्यांना योग्य भाव मिळावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन देताना हितेश सेलोकर यांच्यासोबत मंगेश रेहपाडे, हेमंत सेलोकर, जिल्हा परिषद सदस्य रजनीश खोब्रागडे, सर्कल प्रमुख सुभाष तितीरमारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *