
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जवाहरनगर पोलीसांनी ग्राम खरबी परिसरातील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकुन जुगार खेळणाºया ७ आरोपींना अटक केली तर २ आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.पोलीसांनी घटना स्थळावरून ४ लाख ४४ हजार ३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जवाहर नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया मौजा खरबी परिसरात काही इसम तास पत्तीचा जुगार खेळत असल्याची माहिती जवाहरनगर पोलीसांना मिळाली.त्या आधारे जवाहर नगर पोलीसांनी घटनास्थळी धाड टाकुन जुगार खेळणाºया अधिन मनसजन थोटे, वय २६ वर्ष, रा. खरबी, मनिष गुलाब गौरखेडे, वय २८ वर्ष, रा. खराडी, स्वरूप हर्षल मेश्राम, यय ३० वर्ष, रा. खरबी, रोहित प्रभाकर लांडे, यम २६ वर्ष, रा. महादुला, ता. मौदा, जि. नागपूर, आकाश श्रीधर बावनकर, वय २८ वर्ष, रा. मौदा, जि. नागपूर, पंढरी नामदेव हटवार, वय ४५ वर्ष, रा. खरबी, पांडुरंग गोपीचंद आकरे, वय ३७ वर्ष, रा. खरबी,यांना ताब्यात घेतले तर आशिष पिरम निहेपुंजे, अंदाजे वय ३२ वर्ष, रा. खरबी व आकाश पैदाम, अंदाजे वय ३० वर्ष, रा. खरबी हे दोन आरोपी घटनास्थळावरून पळुन जाण्यात यशस्वी झाले.पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जवाहर नगर पोलीसांनी घटनास्थळावरून फळावरील नगदी २८० रुपये तसेच आरोपींकडील नगदी पैसे, मोबाईल,मोटारसायकल व अन्य साहित्य असा एकुण मिळुन एकुण ४ लाख ४४ हजार ३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीसांनी आरोपीविरूध्द अपराध क्रमांक ११८/२०२६ कलम १२ (अ) महा. जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , ज.नगर पो. स्टे. पो.नि. पाटील यांच्या मार्गदर्शनात पो. उपनि. दुधकावरा, पो. स्टे जवाहरनगर यांनी केली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन जवाहरनगर चे अधिकारी करीत आहेत.