अभिनेते संदीप पाठक यांच्याकडुन बेला येथील विविध उपक्रमांचे कौतुक

भंडारा : अभिनेते संदीप पाठक यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील बेला गावाला आज भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामपंचायत बेला येथे राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती घेतली. देशातील पहिले नेट झिरो (कार्बन न्यूट्रल) गाव म्हणून ओळख मिळवलेल्या बेला गावातील स्वच्छता, वृक्षारोपण, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकासाच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेता संदीप पाठक यांनी केले तर अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे होते, प्रामुख्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नांदागवळी, गट विकास अधिकारी प्रमोद हुमणे,पंचायत समिती सदस्य रत्नमाला चेतुले, कीर्ती गणवीर, माजी सभापती जि.प.संजय गाढवे,विस्तार अधिकारी प्रदीप लांजेवार, विवेक भगत, गणेशपूर च्या सरपंच विद्या मेहेर, मनिषा मनोज इंगळे, अर्चना प्रशांत पंचबुधे,बबिता योगीराज चवरे, राजनी अनिल बाभरे, वंदना किशोर कुथे,सुप्रिया शत्रुघ्न शेंडे,धनराज तिमाजी गाढवे, विनोद राधाकिसन नागपुरे,स्नेहल भैय्यासाहेब मेश्राम, राकेश पांडुरंग मते, श्रीकृष्ण तुकाराम वैद्यसोपान आजबळे उपस्थित होते. गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधत त्यांनी ग्रामीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. या वेळी ग्रामपंचायत प्रतिनिधी, अधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच शारदा मारोती शेंडे (गायधने), यांनी केले तर संचालन व आभारप्रदर्शन ग्रामविकास अधिकारी विलास खोब्रागडे यांनी केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *