
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’च्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी शासनाचे सेलिब्रिटी सदिच्छा दूत तथा मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांनी आज, सोमवार दिनांक १६ मार्च रोजी भंडारा तालुक्यातील ग्राम बेला तसेच साकोली तालुक्यातील ग्राम खैरी/ वलमाझरी येथे सदिच्छा भेट दिली. अभिनेते संदीप पाठक यांनी ग्राम खैरी/वलमाझरी येथे दिलेल्या भेटी- दरम्यान स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या त्रिसूत्रीवर आधारित ग्रामपंचायतीच्या कार्याची पाहणी करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. विकासाच्या मॉडेलची पाहणी दुपारी ठीक ३.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमात संदीप पाठक यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी गावातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि ग्रामपंचायतीने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण कायापालट कसा करता येईल, यावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामस्थांशी संवाद आणि गौरव यावेळी बोलताना संदीप पाठक म्हणाले की, “गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी खैरी/वलमाझरीच्या ग्रामस्थांनी दिलेले योगदान हे राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे. लोकसहभागातूनच समृद्ध पंचायतराजचे स्वप्न साकार होऊ शकते.”
यावेळी त्यांनी गावातील ‘स्वच्छतादूतांशी’ संवाद साधून त्यांच्या कायार्चा गौरव केला. मान्यवरांची उपस्थिती या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला प्रशासकीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाºयांची प्रमुख उपस्थिती होती, ज्यामध्ये उमेश नंदागवळी (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत), पुंडलिक जाधव (गट विकास अधिकारी), नागोराव मेळे, ललित कुंभरे (विस्तार अधिकारी, पंचायत) यासोबतच ग्रामपंचायतीचे प्रशासक पुरुषोत्तम रुखमोडे, प्रशासकीय समिती पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, समूह संसाधन व्यक्ती आणि महिला बचत गटांच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रशासनाचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने या अभियानाला अधिक गती देण्याचे आवाहन करण्यात आले असून, आगामी काळात शाश्वत विकासाची ही घोडदौड अशीच सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप ग्रामस्थांच्या उत्साही प्रतिस- ादात पार पडला.