
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : राणी अवंतीबाई पुतळ्याकडून रेल्वे स्टेशन मार्गाकडे जाणारे वळणावरून मोटरसायकलने रेल्वे स्टेशन कडे जाणारे मोटार सायकल स्वारास याच मागार्ने मुंडी पार कडे जाणारे विना नंबरचे लोडर ट्रॅक्टरने धडक दिल्याने मोटार सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. आज दिनांक १६ रोजी दुपारी तीन वाजता चे दरम्यान इंदुरा खूप देशील रहिवासी उमेश टिकाराम पटले ४३ वर्ष राहणार इंदोरा खुर्द हा आपले मोटार सायकल क्रमांक एम एच १० बि डी १०४० ने जात असता याच मार्गाने मुंडीपार येथील रंगलाल रहागडाले यांचा विना नंबरचा लोडर ट्रॅक्टर चालक सौरभ गणेश वगारे यांने धामेच्या मेडिकल समोर मोटरसायकलला दुपारी तीन तीस वाजता दरम्यान धडक दिल्याने मोटार सायकल स्वार रस्त्यावर पडून जागीच मृत्यू झाल्याने घटनास्थळी मोठा जमा जमून याची माहिती तिरोडा पोलिसांना होताच पोलीस निरीक्षक अमित वानखडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक दगड पाटील व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन मृतकाचे प्रेत शवविच्छेदना करिता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठवून ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तिरोडा पोलीस स्टेशन येथे जमा करून चालका विरोधात अपघाताचा गुन्हा नोंद करून मृतकाचे शव विच्छेदन झाल्यानंतर अंतिम संस्कारा करता नातेवाईकांचे स्वाधीन करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दरड पाटील करीत आहेत.