जनावरांची वाहतुक करणारे पिकअप वाहन जप्त

तिरोडा : तिरोडा तुमसर मार्गाने अवैधरित्या बोलेरो वाहनातून जनावरांची (बैल) वाहतुक करणारे वाहन तिरोडा पोलिसांनी जप्त करून कार्यवाही केली. दिनांक १७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजे दरम्यान तिरोडा तुमसर मार्गावरील तिरोडा बस स्थानकासमोरून महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक एम एस ४० एसी १६७२ जात असतांना तिरोडा पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली. या वाहनाची डाल्यामध्ये तीन बैल त्यांचे चाºया पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता घेऊन जात असल्याचे दिसुन आले.

तिरोडा पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून तीन बैल किंमत अंदाजे ८० हजार व बोलेरो वाहन ५ लक्ष असा एकूण ५ लक्ष हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस शिपाई हेमंत कुमार हर्षे यांची फिर्यादेवरून बोलेरो वाहन चालक देवेंद्र भगतलाल बिल्लोरे २२ वर्ष रा. महालगाव तालुका मोहाडी जिल्हा भंडारा याचे विरोधात प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ड)(ई), सह कलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,६,९ नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बैस करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *