रावणवाडी येथील पर्यटन व्यवसायाची चौकशी करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील रावणवाडी पर्यटन स्थळी सुरू असलेल्या पर्यटन व्यवसायात मोठा गैरप्रकार असुन त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंच जिल्हा भंडारातर्फे भंडारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचाने दिलेल्या निवेदनानुसार दि.०३ मार्च २०२६ रोजी भंडारा तालुक्यातील रावणवाडी जलाशय येथे बोट उलटुन सौरभ मेहरा या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य प्रवासी थोडक्यात बचावले.

यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेतली असता रावणवाडी परिसर हा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आला आहे. येथे विविध संस्थांच्या माध्यमातुन शुल्क आकारून विविध प्रकारचे पर्यटन व्यवसाय चालविले जातात उदा. रावणवाडी जलाशयात बोटींग, घोडासवारी, उंटसबारी तसेच विविध प्रकारचे लहान मुलांसाठी मनारंजनाचे साहित्य इत्यादीच्या माध्यमातुन रावणवाडी परिसर पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहे.

मात्र शासकीय करारनाम्यात नमुद असतांनाही येथे पर्यटनासाठी येणाºया नागरीकांच्या सुरभितेसाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत तसेच येथे अनेक मनोरंजनाचे प्रकार हे अवैधरित्या सुरू असल्याचे दिसुन येते. त्याला आवश्यक शासकीय परवानगी घेण्यात आलेली नसुन मुदत संपली असतांनाही सदर व्यवसाय सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्या कारणाने दि.३ मार्च २०२६ रोजी रावणवाडी जलाशयात नाव उलटून एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून इतर पर्यटकांचा थोडक्यात जीव वाचला. करिता रावणवाडी पर्यटन स्थळ येथे सुरु असलेल्या जलपर्यटन, घोडासवारी, उंट सवारी व अन्य मनोरंजन साधनांच्या शासकीय परवानगी, शासकीय करारनामे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा दि. २३ मार्च २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचाचे विदर्भ अध्यक्ष सुरज परदेशी, विदर्भ कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे,राहुल थोटे,संजय डोबळे, मुन्ना महलाने, राजकुमार दहेकर, विजय बावनकर,नम्रता बागडे, राणी रामटेके आदि उपस्थित होते. ल्लल्लल्ल

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *