प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव मनकर यांनी घेतला भंडारा जिल्हयातील किसान सभेचा आढावा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव मनकर यांनी आज दि.१६ मार्च रोजी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय तिलक वार्ड, भंडारा येथे भंडारा जिल्हयातील किसानसभेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकºयांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली. याप्रसंगी प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांनी भंडारा जिल्हयातील प्रकल्पांबद्दल व त्यावर अवलंबून असलेल्या शेतीची माहिती दिली. त्यांच्या सोबत आलेले विदर्भ किसानसभा अध्यक्ष जगदीश जुनगरी यांनी या किसान सभेमध्ये जिल्हयातील शेतकºयांच्या विविध समस्या सांगितल्या. तसेच किसान सभेच्या अध्यक्षांनी जिल्हयातील शेतकºयांच्या अडचणी सांगितल्या व सध्या धान खरेदी बंद असून त्यांनी धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *