जनावरांची अवैध वाहतुक, ५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लाखनी पोलीसांनी जनावरांना क्रूरपणे वागणूक देत त्यांची अवैधरित्या वाहतूक करणाºया बोलेरो पिकअम वाहनावर कारवाई करीत चार जनावरांची सुटका केली तसेच ५ लाख ३५ हजारांचा मुद्देमालही जप्त केला. लाखनी पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लाखनी पोलीसांनी मौजा के. के. लॉन लाखनी समोर सापळा रचुन बोलेरो पिकअप गाडी क्र. एम.एच.३६ ए.ए. १४६९ ला थांबवुन तपासणी केली असता वाहनामध्ये २० हजार रूपये किंमतीचे दोन पांढरे रंगाचे बैल, १० हजार रूपये किंमतीचा एक पांढºया रंगाचा काळे डाग असलेला बैल व ५ हजार रूपये किंमतीचा एक पांढरा रंगाचा गोरा असे एकुण ३५ हजार रुपये किंमतीचे जनावरांना क्रूरपणे दोराने बांधुन, कोंबुन निर्दयतेने वागणुक देवुन जनावरांची कत्तल करण्याचे उद्देशाने अवैधरित्या वाहतुक होत असल्याचे दिसुन आले.

पोलीसांनी बोलेरो पिकअप गाडी किंमत ५ लाख रूपये व ३५ हजार रूपये किंमतीची जनावरे असा एकुण ५ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी अनमोल रिमदेव बोदेले वय ३० वर्ष रा. मानेगाव / बाजार ता.भंडारा जि.भंडारा याचेविरूद अप.क्र. १७३/ २०२६ कलम ५ (अ), (ब), ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सन २००५ (सुधारीत कायदा २०१५) सहकलम ११ (१) (ड) प्राण्यास निर्दयतेने वागवीने प्रतिबंधक करण्याबाबत अधिनियम १९६० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन , अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली शिवमं विसापुरे , स.पो.नि. गावंडे यांच्या मार्गदर्शनात स.फौ.आत्राम, पो.स्टे. लाखनी यांनी केली असुन पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *