‘त्या’ विक्रमात भंडाºयाच्या लेकीचा वाटा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्वरचित ८१ बंदिशी सलग ४१ महिलांनी गात नागपुरात विक्रमाची नोंद करण्यात आली. या विक्रमात भंडाºयाच्या लेकीचा खारीचा वाटा असून सर्वदा समीर जोशी हिने सुद्धा या सादरीकरणात बंदीशी गायल्या. या भंडाºयाच्या विक्रमवीर लेकीचे कौतुक होत आहे. नागपूर येथील बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या संगीत विभाग प्रमुख प्रा. दीपश्री पाटील यांनी आपल्या ४० महिला, मुली शिष्यांना घेत हा विक्रम प्रस्थापित केला आहे. नागपूर येथील सुरेश भट सभागृह ४ एप्रिल रोजी झालेल्या या सादरी करण प्रा. पाटील यांनी स्वरचित ८१ बंदीशी आपल्या ४० शिष्यांसह सलग गायल्या. याची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड आणि एशिया बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. या विक्रमात सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात आले. या ४० शिष्यांमध्ये भंडारा येथील मूळ रहिवासी, आणि सध्या नागपूर येथे वास्तव्यास असलेल्या सर्वदा समीर जोशी हिचा समावेश आहे. या विक्रमात सर्वदा चा वाटा असल्याने तिचे भंडारेकर आप्तेष्टांकडून कौतुक केले जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *