बलात्काराच्या गुन्हयातील फरार आरोपी जेरबंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बलात्कार प्रकरणात मागील दोन वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात अखेर भंडारा पोलीसांना यश आले आहे.अजय रामप्रसाद यादव, अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष रा. उत्तर प्रदेश असे आरोपीचे नाव आहे. दोन वर्षापुर्वी २७ जुलै २०२५ रोजी पोलीस स्टेशन भंडारा येथे पिडीत महिलेने तक्रार आरोपी विरोधात तक्रार नोंदविली होती.पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अजय रामप्रसाद यादव हा व पिडीत महीला भंडारा येथील एका हॉटलेमध्ये भंडारा काम करीत असतांना त्यांच्यात पे्रमसंबंध जुळले. दरम्यान आरोपीने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवुन सन २०२४ मध्ये जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्तापीत केले. पिडीत महीलेने आरोपीला अनेकदा लग्नाबाबत विचारणा केली असता तो वेळ मारून नेत होता दरम्यान आरोपी सन २०२४ पासुन भंडारा इथुन फरार झाला असल्याची तक्रार महिलेने पोलीसांत नोंदविली.

महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे अप क्र. ९६६/२०२५ कलम ६९ भारतीय न्याय सहींता अन्वये गुन्हा नोंद करून गुन्हयाचा तपास मपोउपनि रजनी तुमसरे पोलीस स्टेशन भंडारा यांच्याकडे सोपविण्यात आला. महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये फक्त आरोपीचे नावाव्यतीरीक्त ईतरकुठलीही पुरेशी माहीती नसतांना पोलीसांनी आरोपी व फिर्यादी ज्या ठिकाणी दोन वर्षापुर्वी काम करीत होते. त्या ठिकाणी जावुन आरोपीबाबत माहीती घेतली. तेव्हा आरोपी हा सध्या उत्तर प्रदेश येथे राहात असल्याचे पुढे आले.मात्र उत्तर प्रदेश मध्ये नेमके कुठे राहतो याची याबाबत माहीती नसल्याने आरोपीचे अटकेस अडचन येत होती. पोलीसांनी आरोपीच्या शोधासाठी ‘नॅटग्रीड’ प्रणालीचा वापर करून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला सोबतच परीसरातील बातमिदारांची मदत घेतली.

दरम्यान काही दिवसापुर्वी आरोपी अजय रामप्रसाद यादव हा भंडारा येथे परत आला असुन नवीन मुलीच्या शोधात असल्याची खात्रीशिर माहीती मिळाल्याने भंडारा पोलीसांनी म्हिला पोलीस कर्मचारीच्या मदतीने आरोपीला अटक करण्याकरीता सापळा रचला व त्या सापळ्यात आरोपी अलगद अडकला. दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी भंडारा पोलीसांनी महीला पोलीस कर्मचारीच्या मदतीने आरोपीला शास्त्री चौक भंडारा येथे गुपचुप खाण्याकरीता बोलाविले. आरोपीला कुठलाही संशय येवु नये याची पुर्णपणे खबरदारी घेण्यात आली होती. आरोपीस कुठलाही संशय न आल्याने तो कथीत मैत्रीण म्हणुन भेटण्याकरीता शास्त्री चौक भंडारा येथे आला असता पिडीत महिलेच्या माध्यमातुन आरोपीची ओळख पटवुन पोलीसांनी आरोपी अजय रामप्रसाद यादव याला ताब्यात घेतले. आरोपीने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा विलास काळे यांचे मार्गदर्शनात भंडारा ठाणेदार पो.नि. उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात मपोउपनि. रजनी तुमसरे, पोहवा. आशिष तुमाने, मपोहवा. गिता शेडे, मपोशि. रिना नागोलकर, पोशि. नमीत सयाम, पोशि. पेशने चालक पोना. भाजीपाले यांनी पार पाडली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *