
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्य शासनाच्या प्रारंभिक यादीत भंडारा जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकºयांमध्ये नाराजी होती. मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष आशु गोन्नाडे यांनी २० मार्च रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिल्यानंतर आणि २३ मार्च रोजी प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार भंडारा जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीवर हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
साई प्लाझा भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत चिंतामणी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र फुलबांधे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र पवनी तालुक्यात सुरू करण्यात आले आहे. २९ मार्च ते ३१ मार्च दरम्यान नोंदणी प्रक्रियेत ९०शेतकºयांनी सहभाग घेतला असून त्यांच्या मालाची मोजणी सुरू आहे.शेतकºयांच्या मागणीचा विचार करून नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली असून मोजणीची अंतिम मुदत ३० एप्रिलपर्यंत आहे. प्रति हेक्टर १२.१७ क्विंटल खरेदीची मयार्दा निश्चित करण्यात आली आहे. हरभºयाचा आधारभूत खरेदी दर ५८७५ रुपये प्रति क्विंटल आहे, तर बाजारभाव यापेक्षा ७०० ते ८०० रुपयांनी अधिक आहे. राजेंद्र फुलबांधे यांनी जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.