महावितरणचा सामाजिक उत्कर्षाचा संकल्प

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून महावितरणच्या महाल विभागाने सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. महाल विभागातील तुळशीबाग आणि नंदनवन उपविभागाच्या संयुक्त विद्यमाने केवळ औपचारिकता न पाळता, रक्तदान शिबिर आणि मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मंत्राला कृतिशील अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे पवित्र पर्व साधून महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विभागातील १५ कर्मचाºयांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत रक्तदान केले.

“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असल्याचे मानून, आपत्कालीन स्थितीत रुग्णांना रक्ताची उणीव भासू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. मेयो रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीच्या वैद्यकीय चमूने या शिबिरासाठी विशेष सहकार्य केले. उत्सवाचे स्वरूप केवळ जल्लोषापुरते मर्यादित न ठेवता, सामाजिक दायित्वाच्या भावनेतून १३ एप्रिल रोजी ‘कल्याण मूकबधिर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, जेणेकरून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात अडथळा येऊ नये. यासोबतच, सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहºयावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली. ते म्हणाले की, “वीज सेवेसोबतच सर्वसामान्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे.” यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता पराग उके आणि प्रवीण चांभारे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सहाय्यक अभियंता लसणे, वाकडे, वसिम, रामटेके, कुणाल बागडे आणि रागिनी ढवडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुबोध चहांदे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली खोब्रागडे यांनी केले. उपस्थितांचे आभार सहाय्यक अभियंता वाकडे यांनी मानले. या संपूर्ण सोहळ्यासाठी महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *