
भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : दरवर्षीप्रमाणे वन विभागाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाणवठ्यांवर वन्य प्राण्यांची पाच ठिकाणी मचाणावर गणना करण्यात येणार आहे. यावर्षीही १ मे २०२६ रोजी तुमसर रेंज अंतर्गत ५ पाणवठ्यांवर वन्य प्राणी गणना आयोजित करण्यात आली आहे.
या गणनेदरम्यान सहभागी कर्मचारी व स्वयंसेवक जंगलात रात्रभर थांबून मचाणावर बसून पाणवठ्यांवर येणाºया वन्य प्राण्यांची नोंद करतात. रात्रीच्या शांत वातावरणात निसर्गाचा अनोखा अनुभव घेत प्राण्यांचे निरीक्षण केले जाते, ही या उपक्रमाची खासियत आहे. वन विभागाकडून या उपक्रमात निसर्गप्रेमी, स्वयंसेवी संस्था तसेच इच्छुक नागरिकांना देखील सहभागी होण्याची संधी दिली जाते. इच्छुकांनी अर्ज केल्यास त्यांना या गणनेत सहभागी करून (ठॠड) घेतले जाते. ही गणना १ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होऊन २ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत मचाणावर बसून पाणवठ्यांवर येणाºया प्राण्यांची नोंद केली जाणार आहे. वन विभागाच्या या उपक्रमामुळे वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती होत असून, निसर्गाशी जवळीक साधण्याची एक उत्तम संधी नागरिकांना मिळत आहे.