
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी शहरातील नागरिकांवर अन्यायकारक व अवाजवी कर वाढ लादणाºया नगरपंचायत लाखनी प्रशासनाला जाहीर इशारा देण्यासाठी राजकीय विचार बाजूला ठेवून दिनांक २५ फेब्रु. २०२६ रामकृष्ण मंगल कार्यालय लाखनी येथे व्यापारी असोसिएशन व लाखनी येथील समस्त जनतेतर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नगरसेवक बबलू निंबेकर, नगरसेवक सचिन भैसारे , व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष परवेज आकबानी, व्यापारी परमानंद बजाज , अबूबकर आकबानी, लाखनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेश वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी गावकरी व समस्त जनते वर अवाजवी कर आकारणी संबंधी सभा बोलावून या सभेत या आकारणीचा अनेक गावकरी व व्यापाºयांनी निषेध नोंदविलेला आहे.
या सभेत याकर आकारणी संबंधी लेखी निवेदन जिल्हाधिकारी भंडारा आमदार नाना पटोले व खा. प्रशांत पडोळे यांनाही लेखी निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. अवाजवी कर आकारणी संबंधी नगरपंचायत लाखनीला लेखी निवेदन देण्यासाठी शेकडो व्यापारी व समस्त ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. अवाजवी कर आकारणीच्या संदर्भात नगरपंचायत च्या मुख्याधिकारी यांना नगरपंचायत कार्यालयात जाऊन लोकांनी व व्यापाºयांनी लेखी निवेदन दिले . अवाजवी कर आकारणी कमी करण्यात यावी शिक्षण कर वृक्ष कर रोजगार हमी कर कमी करावे .जुन्या आकारणी प्रमाणे कर आकारणी करावी आदी बाबत चर्चा घडवण्यात आली.
यावेळी लाखनी नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांनी जनतेला आश्वासन दिले की लाखनी नगरपंचायतीचे दहा दिवस जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कर्मचाºयांचे एक विशेष टेबल नगरपंचायत आवारात लावले जाईल त्यावेळी जनतेने व व्यापाºयांनी कर वाढ संबंधीच्या असलेल्या समस्या घेऊन नगरपंचायत कार्यालयात येऊन आपल्या समस्या अवगत कराव्या व त्या सोडवून घेण्याचा प्रयत्न करावा. असे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी नगर पंचायत लाखनी यांनी जनतेला दिले आहे. परंतु नगरपंचायतने अवाजवी कर आकारणी लादली असताना जनतेसमोर व व्यापारी वर्गासमोर एवढी मोठी समस्या उद्भवली असताना दोन नगरसेवक सोडून इतर नगरसेवक मात्र नदारत होते. याचीही उलट सुलट चर्चा लाखनी ग्रामस्थांमध्ये होताना दिसत आहे. निवेदन देताना नगरसेवक राजेश बबलू भाऊ निंबेकर नगरसेवक सचिन भैसारे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष परवेज आकबानी, व्यापारी परमानंद बजाज, व्यापारी अबूबकर आकबानी, लाखनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेश वंजारी, इकबाल आकबानी, किशोर वाघाये , चोपराम तिवाडे ,विनोद थोटे, शरद निर्वाण, अनिल हारोडे प्रितेश कराडे ,जितेंद्र भुरे, आणि अनिल नागपुरे ,धनंजय गिरेपुंजे , राजेश गायधनी, माधव भोयर गुरुजी आदि उपस्थित होते.