
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील संत कोलबा स्वामी वार्ड येथे राहणारे मुरलीधर खोत हे त्यांचे परिवारासह दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी काही कार्यक्रमाकरिता बाहेरगावी गेले होते. दिनांक ०६ मे २०२६ रोजी सायंकाळी ते परत आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. घराच्या आत सामान अस्ताव्यस्त दिसून आले. पाहणी केल्यावर घरातील ४५,००० रू नगदी व एक एंड्राइड मोबाईल किंमत ७,००० रू असा ऐवज चोरी झाल्याचे समजून आल्याने पो. स्टे. भंडारा येथे अप क्र १०४०/२६ कलम ३०५(ए),३३१ अन्वये गुन्हा नोंद करून तपास डीबी पथकाकडे देण्यात आला.
पथकाने तपासाची चक्रे फिरवून गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा युनूस पठाण, रा. बाबा मस्तान शहा वार्ड भंडारा याने केल्याचेनिष्पन्न झाले. आरोपी शोध करून तत्काळ ताब्यात घेतल्यावर कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. सद्यस्थितीत आरोपी अटकेत असून गरीब कुटुंबास वेळीच न्याय मिळाला असल्याची भावना जनसामान्यात आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास काळे, पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे मार्गदर्शनात भंडारा शहर डीबी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष बोरकर, सहा फौजदार तुळशीदास मोहरकर, हवालदार गीता शेंडे, कॉन्स्टेबल अनुप वालदे, रोहित अंबादे, शेषराव राठोड यांचे पथकाने केली.