युथ काँग्रेसच्या आक्रमक एल्गारापुढे प्रशासन झुकले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : जनतेच्या प्रश्नासाठी लढणाºया लाखांदूर तालुका युवक काँग्रेसने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला अक्षरश: गुडघे टेकायला भाग पाडले. निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ करत नायब तहसीलदारांनी दाखविलेल्या हेकेखोर भूमिकेविरोधात संतप्त युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट तहसील कार्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाचा निषेध नोंदविला. ‘जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही!’ असा स्पष्ट इशारा देत युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. पूयार – मडेघाट – लाखांदूर या ९ कि.मी रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येणार होते. तसेच, मागणी पूर्ण न झाल्यास १६ जून रोजी ‘रस्ता रोको’ आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, तहसीलदार अनुपस्थित असल्याने नायब तहसीलदार धकाते यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेलेल्या लाखांदूर तालुका युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश देशमुख, तालुका उपाध्यक्ष आशिष शहारे आणि युवक काँग्रेस पदाधिकाºयांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करण्यात आला. निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ होत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली.‘जनतेच्या प्रश्नासाठी वेळ नाही, मग अधिकारी कशासाठी?’ युवक काँग्रेसने उपस्थित केलेल्या या सवालाने तहसील प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. जनतेच्या मूलभूत प्रश्नावर प्रशासन जर उदासीन असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?

असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. जनतेच्या मुद्यला अग्रस्थानी घेवून, युथ काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आणि तत्काळ थेट तहसील कार्यालयात ठिय्या मांडला. आणि प्रशासन तथा प्रशासकीय अधिकारी यांचे विरोधात घोषणाबाजी तून निषेध दर्शविला. युवक काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर तहसील प्रशासन हादरले आणि नायब तहसीलदार धाकाते तसेच अनिल पवार यांना आंदोलनस्थळी यावे लागले. त्यांनी स्वत: गेटवर येऊन निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तालुकाध्यक्ष प्रकाश देशमुख व उपाध्यक्ष आशिष शहारे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून, ‘जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढणारे हेच खरे नेतृत्व!’ अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. यात उल्लेखनीय बाब म्हणजे, जर प्रशासन किव्वा पदाधिकारी एखाद्या पदाधिकाºयांसोबत अशी वागणूक करा असतील तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न आता जनतेकडून उपस्थित केला जात आहे. युथ काँग्रेसच्या आक्रमक एल्गारापुढे प्रशासन झुकलं आणि नायब तहसीलदारांचा हेकेखोरपणा अखेर मोडला. अशी जनप्रतिक्रिया उमळू लागली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *