
भंडारा पत्रिका प्रतिनिधी खापा /तुमसर : रामटेक-तुमसर मार्गावरील खापा शेतशिवारात हसारा टर्निंग जवळ रामटेक कडुन येत असलेली महिंद्रा बोलेरो क्रमांक एमपी ०४ बीसी ०६१२ ने तुमसर कडून धान भरून येत असलेल्या ट्रक क्रमांक एमएच ३१ एपी ५६१७ यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात महिंद्रा बोलेरो वाहनात असलेले दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी १.३० वाजता घडली. या अपघातात महिला पुरुष व लहान मुले असे एकूण १२ प्रवासी जखमी आहेत. हेमलाल राधे वरखडे (५६) रा. शितलमिरी ,पो. चिखलीमाल, ता. शाहापूर, जि. बैतूल व भुता भादु सरयाम वय ६७ वर्ष रा. चिकली,ता. घोडाडोंगरी, जि. बैतुल अशी मृतकांची नावे आहेत.
रामटेक तुमसर मार्गावरील हसारा टर्निंग पॉईंट समोर रविवारला महिंद्रा बोलेरो व धान भरलेला ट्रक त्यामध्ये अमोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की रामटेककडून तुमसर कडे जाणाºया महिंद्रा बोलेरो गाडी ची दिशा पुर्णत: बदलून गेली. यात बोलेरो गाडीचा समोरील भाग पूर्णत: क्षतीग्रस्त झाला असून ट्रकचा दर्शनी भागाचाहीचुराळा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. नागरिकांनी घटनास्थळी गाठून गाडीत अडकलेल्या प्रवाशांना तात्काळ काढून रूग्णवाहिकेच्या मदतीने उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. या अपघातात बोलेरो गाडीतील दोनप्रवाशांचा मृत्यू झाला असून सात प्रवासी गंभीर जखमी आहेत तर पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यात तीन महिलांचा व बालकांच्या समावेश आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. महिंद्रा बोलेरो मधील प्रवासी हे मध्य प्रदेश येथील बैतूल जिल्ह्यातून परिसरातील आहेत . हे सर्व प्रवासी तुमसर येथील राजाराम लान येथील आयुर्वेदिक औषधी कार्यक्रमात उपस्थित करण्याकरिता येत होते. पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.