
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा -: पेट्रोल डिझेल गॅस इंधन दरवाढ तसेच जनतेला भेडसावणाºया प्रश्नावर दिनांक १ जूनला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यव्यापी आवाहना नुसार भंडारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके कॉम्रेड सदानंद इलमे कॉम्रेड गजानन पाचे यांच्या नेतृत्वात निषेध व्यक्त करून जिल्हाधिकाºयामार्फत महामहीम राष्ट्रपती ,प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्याच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात पेट्रोल डिझेल गॅस इंधन दरवाढ मागे घ्या, वाढत्या महागाईला आळा घाला, शेतकºयांच्या ट्रॅक्टरला सवलतीच्या दराने डिझेल द्या, शेतकºयांना खते बियाणे सवलतीच्या दराने हवे तेवढे पुरवठा करा, पेट्रोल डिझेल गॅस वरील अधिभार कमी करून सवलतीच्या दराने इंधन पुरवठा करा, नीटची पुनर्परीक्षा देणाºया सर्व विद्यार्थ्यांना रेल्वे, एसटीने मोफत प्रवास तसेच जेवण व राहण्यासाठी भत्ता द्या, तसेच जातनिहाय जनगणना करताना एससी एसटी प्रमाणे ओबीसी प्रवगार्ची स्वतंत्र नोंद घ्या या मागण्यांचा समावेश करण्यात आला. यावेळी कॉम्रेड हिवराज उके कॉम्रेड सदानंद इलमे कॉम्रेड गजानन पाचे कॉम्रेड भगवान मेश्राम कॉम्रेड अंजिरा उके कॉम्रेड वामनराव चांदेवार कॉम्रेड राजू लांजेवार कॉम्रेड माणिकराव कुकडकर कॉम्रेड गणेश क्षीरसागर इत्यादींची उपस्थिती होती.