शेतकºयांची लूट थांबवा : चरण वाघमारे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुमसर विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शासकीय धान खरेदीच्या नावाखाली शेतकºयांची क्रूर चेष्टा आणि आर्थिक लूट करण्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण अनागोंदी कारभाराला, अनियमिततेला आणि पक्षपातीपणाला जबाबदार असणारे भंडारा जिल्ह्याचे जिल्हा विपणन अधिकारी (डिएमओ) यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तुमसरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरणभाऊ वाघमारे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. प्रेस प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चरणभाऊ वाघमारे यांनी म्हटले आहे की, एकीकडे शेतकºयांचे उत्पन्न वाढावे म्हणून संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून बियाणे, खते व यंत्रांवरकोट्यवधी रुपयांचा खर्च सरकार करत असल्याचा आव आणते; परंतु दुसरीकडे शेतकºयांचे पीक जेव्हा प्रत्यक्ष विक्रीसाठी तयार होते, तेव्हा शासकीय खरेदी केंद्रांवर ‘विशिष्ट क्विंटल’ची जाचक अट लावून त्यांची अडवणूक केली जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *