
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. अंतिम उमेदवारांच्या यादीत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश आनंदराव ब्राह्मणकर तसेच अपक्ष उमेदवार नरेश माणिक ईश्वरकर आणि सचिन यशवंत कुंभलकर यांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी एकुण ७ उमेदवारांनी अर्ज भरला होता त्यामध्ये प्रफुल्ल गोपालदास अग्रवाल (अपक्ष) , दिलीप वामन बनसोड (इंडियन नॅशनल काँग्रेस) , अविनाश आनंदराव ब्राह्मणकर(भाजप)र् , अभिषेक जगदीश कारेमोरे ( अपक्ष), सचिन यशवंत कुंभलकर अपक्ष , नरेश माणिक ईश्वरकर अपक्ष व भास्कर ओंकार रहांगडाले अपक्ष यांचा समावेश होता.