कारमधून अवैध मद्य तस्करीचा पर्दाफाश; साकोलीत ७.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील साकोली शहरात अवैध मद्य तस्करीविरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री धडक कारवाई करत कारसह ७ लाख २६ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सिव्हिल वॉर्ड, साकोली येथील पंकज अमरलाल जगिया (वय ४१) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही कारवाई स्थानिक पोलीस यंत्रणेऐवजी थेट उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने केल्याने शहरातील अवैध दारू व मादक पदार्थांच्या व्यवसायाबाबत स्थानिक पोलीस ठाण्याच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून मोठ्या प्रमाणात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एमएच-३६-झेड-१७४३ क्रमांकाच्या मारुती डिझायर कारची तपासणी केली. तपासणीदरम्यान विविध ब्रँडच्या बिअर व मद्याच्या बाटल्या वाहनातून जप्त करण्यात आल्या. यात ट्युबोर्ग, किंगफिशर, बडवाईजर, मॅकडॉवेल, रॉयल चॅलेंज, आॅल सिझन, रॉयल स्टॅग, सिग्नेचर आणि रॉयल ग्रीन या ब्रँडच्या मद्याचा समावेश आहे. पोलिसांनी वाहनातील १६ हजार ७४० रुपयांचे मद्य, ७ लाख रुपयांची कार आणि १० हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ७ लाख २६ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करी करणाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, साकोली शहरातील काही नामांकित हॉटेल्स, लॉज तसेचइतर ठिकाणी अवैधरित्या मद्य व विविध मादक पदार्थांचा पुरवठा होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

विशेषत: तरुण वर्ग आणि शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत सहजपणे व्यसनाधीन पदार्थ पोहोचत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. यामुळे अनेक युवक नशेच्या आहारी जात असून काही ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे. गांजा, सुगंधित तंबाखू, प्रतिबंधित गुटखा तसेच इतर अमली पदार्थांचा पुरवठा शहरातील तरुणांपर्यंत नेमका कोणत्या मागार्ने पोहोचतो, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पालक, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी संबंधित यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून अवैध मद्य व मादक पदार्थांच्या साखळीचा पदार्फाश कर- ावा, अशी मागणी केली आहे. अलीकडील काळात उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने सातत्याने केलेल्या कारवायांमुळे अनेक अवैध धंदे उघडकीस येत आहेत. त्यामुळे शहरातील दारू, मादक पदार्थ आणि व्यसनमुक्तीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली असून संबंधित विभागांनी व्यापक तपास मोहीम हाती घेऊन संपूर्ण रॅकेट उघड करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *