भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील हनुमान वार्ड परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (स्था. गु. शा.) पथकाने धाड टाकून दहा जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ६५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस हवालदार भोंगाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा हनुमान वार्ड येथील राहुल कटकवार यांच्या घराशेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान रोशन खेडकर, गोपाल सोनेकर, बॉबी कटकवार, किरण मदनकर, शाहिद शेख, प्रतिक नागपुरे, मारोती मोहनकर, मुकेश मेश्राम, मनोज शेंदरे व साहिल सोनेकर हे जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ७,५०० रुपये, आरोपींकडील ३५,७०० रुपयांची रोख रक्कम, ९ मोबाईल फोन, ४ मोटारसायकली, ५२ ताशपत्त्यांचा संच व जुगारासाठी वापरण्यात आलेली चटई असा एकूण ३,६५,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोंगाडे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.