भंडारा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन देशभरात अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्येही स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवून ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडल्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीताचे गायन करून तिरंग्याला सलामी दिली. याप्रसंगी बोलताना बँक प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला आणि शेतकºयांच्या विकासाला अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी वृंद आणि पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *