तरुण -तरुणी बरोबर धावले ५ वर्षीय बालके
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा:– गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व सेवा संकल्प अभियानांतर्गत २ ऑक्टोबर २०२५ ला दिवंगत खेळूंद स्व. गणपत बांडे, स्व. श्रीपत बांडे, स्व. रवीशंकर भिवगडे, स्व. मंगेश बांडे, स्व. पुरुषोत्तम बांडे यांचे स्मरणार्थ वैनगंगा स्पोर्टिंग क्लब भंडारा च्या वतीने ४७ वी वैनगंगा ओपन मॅरेथॉन महिला-पुरुष स्पर्धा मोठ्या उत्साहात नुकतीच घेण्यात आली.
मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी एस. एस. मोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी टेक्निकल असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मधुकांत बांडेबुचे, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त मोहन दादो, एकविध संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत ईलमे, सचिव सुनील कुरंजेकर, जाणता राजा कुस्ती स्पोर्ट्स अकादमी अशोक बनसोड, कुस्ती मार्गदर्शक विलास फेजरकर, क्रीडा शिक्षक बेनिलाल चौधरी, रशिद छुटे, दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्याधिकारी हरिश मदान, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धेपूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुऱ्याकृती पुतळ्याला माल्यार्पण करून स्पर्धेला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून महात्मा गांधी चौक येथून सुरुवात करण्यात आली.
त्यात महिला स्पर्धा गांधी चौक, जळाराम चौक- खांब तलाव मार्गे खात रोड- जी.बी. क्लब खोखरला, टवेपार, खुर्शीपार मिलन हॉटेल येथून परत रुक्मिणी नगर, ग्राउंडपर.
जळाराम चौक- खांब तलाव मार्गे खात रोड- जी.बी. क्लब खोखरला टवेपार, खुर्शीपार मिलन हॉटेल येथून परत रुक्मिणी नगर, ग्राउंडपर समारोप करण्यात आला. यामध्ये ४५ मुलं-मुलींनी सह ५ वर्षीय चिमुकल्यांनी सुद्धा भाग घेतला होता. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेक्निकल संघटनेचे अध्यक्ष ॲड. मधुकांत बांडेबुचे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त मोहन दादो, आरपीएफ आय नागपूर चे രवो ಖತಿ, सुरेश रेरुपाडे, माजी धावपटू देवराव खाती उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. त्यात मुली करिता ५ व मुलांकरिता ११ किलोमीटर ची स्पर्धा होती. त्यात मुलांमध्ये अजित उके (सुरखाडा), क्रिश सोनवाने, अक्षय कडव व मुलींमध्ये प्राची बोंद्रे (भंडारा), मेघा खवास (राजोली), वैशाली वंजारी (डोंगरगाव) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
विशेष आकर्षण म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेत पोलीस पूर्व प्रशिक्षण घेणारे तरुण-तरुणींबरोबर ५ वर्षांच्या मुलं-मुलींसुद्धा सहभाग नोंदविला होता. मान्यवरांनी विजयी स्पर्धकांना शुभेच्छा देऊन काही कारणास्तव पराजय झालेल्या खेळाडूंना पुन्हा प्रयत्न करण्यासाठी शुभेच्छा व विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन अरुण बांडेबुचे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बेनिलाल चौधरी यांनी मानले.