गांधी-शास्त्री जयंत निमित्त तुमसर काँग्रेसचे अभिवादन

सत्य, अहिंसा आणि राष्ट्रसेवेच्या विचारांना उजाळा

 

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

तुमसर: राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तुमसर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.

यावेळी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेच्या कार्याला उजाळा देण्यात आला. देशाच्या उभारणीत दोन्ही महान नेत्यांनी दिलेले योगदान आणि त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसेच्या मार्गावर तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या राष्ट्रसेवा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिषेच्या आदर्शावर चालत समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार करण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमास प्रमोद तितीमारे, बाळभाऊ ठाकूर, प्रमोद कटरे (अध्यक्ष, तुमसर तालुका काँग्रेस), कान्हाभाऊ बावनकर, शैलेश पडोळे, कुसुमताई कांबळे, ममता बिसेन, निशा गणवीर, माधुरी धुर्वे, अरविंद ठाकरे, विजयजी रतिराम चौधरी, विजयजी चौधरी, प्रफुल बिसेन, दिनेशजी भवसागर, तारेद्रजी डिंकवार, शिवभाऊ बोरकर, रामप्रसादजी काहळकर, विनोद कोकोडे, नानाभाऊ ठवकर, संजय गजाम, दिलीपने लांजेवार व रविभाऊ भगत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. उपस्थितांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या राष्ट्रनिर्माणच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या आदर्शाचा अंगीकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *