दुकानफोडी व वाहन चोरीतील आरोर्पिना अटक

◆ दुचाकी जप्त ◆ लाखांदूर पोलिसांची कामगिरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

पारडी : ज्वेलर्सचे दुकान फोडून सुमारे सातशे ग्रॅम चांदी आणि सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या तसेच वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना पकडण्यात लाखांदूर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे.

ही कारवाई १५ ऑक्टोबर रोजी लाखांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांनी केली आहे. या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असलेला अमरसिंग दर्शनसिंग कलानी (३३) रा. शिवारपूर बंदर ता. चिमुर जि. चंद्रपूर, (ह.मु. शिरोया लाखांदूर) याच्यासह एका अल्पवयीन बालकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन अड्याळ आणि गोंदिया जिल्ह्यातील रावनवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलീസ് सूत्रानुसार, लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष चव्हाण व त्यांचे डीबी पथक ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात लाखांदूर हद्दीत मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत होते. दरम्यान, पोलिसांना शिरोया येथे एका अल्पवयीन मुलाच्या ताब्यात एक संशयास्पद मोटर सायकल आढळली. पोलिसांनी खाक्या दाखवताच संशयित अल्पवयीन बालकाने आपल्या साथीदारासह मिळून २८ ऑगस्ट २०२६ रोजी मरारटोला (गोंदिया) येथून काळया रंगाची होंडा लिओ मोटर सायकल चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर आणखी मोठे धक्कादायक सत्य समोर आले. याच चोरट्यांच्या टोळीने ५ ते ६ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री पवनी तालुक्यातील पिंपळगाव/निपानी येथील एका सोन्याच्या दुканаचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने, अंदाजे ७०० ग्रॅम चांदी तसेच भेटेक्सच्या वस्तूंची चोरी केली होती. चोरांनी चोरी केलेले दागिने नागपूर येथील मित्राला ८ ऑक्टोबर २०२६ रोजी अवघ्या २५ हजार रुपयांत विकल्याची माहिती समोर आली आहे.

लाखांदूर पोलिसांच्या सतर्क व तपासी भूमिकेमुळे परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, या रॅकेटमधील इतर साथीदार आणि सोन्या-चांदीचा माल खरेदी करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *