भंडारा पत्रिका प्रतिनिधि,खापा/तुमसर : भंडारा-तुमसर महामार्गावर तुमसर (खापा) पंचायत समिती जवळ प्रीती राईस मिल समोर बारा फूट लांब साप अजगर प्रजातीच्या रस्ता ओलांडताना दिसून आल्याने जाणारा येणाऱ्या वाहन धारकांची एकचं धांदल उडाली.
खापा पंचायत समिती जवडील प्रीती राईस मिल समोर रस्ता ओलांडताना १२ फूट लांब अजगर प्रजातीच्या साप १५ सप्टेंबरला रात्री दहा वाजे दिसून आला. सर्पमित्र आकाश पिकलमुंडे यांना तात्काळ बोलून सापाचे रेस्क्यू करण्यात आले. अजगर दिसून आल्याचे बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली असता मांगली,खापा आणि तुमसर येथील नागरिक घटनास्थलळी मोठ्या संख्येन अजगर पाहण्याकरिता धावून आले.
यावेळी सर्पमित्र असोसिएशन संपूर्ण ग्रुप आकाश पिकलमुंडे, दुर्गेश मल्लाधरे, शब्बीर अली,नितीन मेश्राम, शुभम तुमसरे, सूर्य कोडे, पियुष मोह्तुरे, अभय गयेगये, सुरज अँकर,लक्ष्मण खडसे, नितेश डोंगरे खुशाल मेश्राम सागर बसणे सागर धोतरे राम मेश्राम अजय बोपचे आकाश उकुर्डे रोहित पाटील मोहित देशमुख दुर्वेश हलमारे आदित्य भोयर या सर्पमित्रांनी मेहनत घेतले व अधिवासात सोडून दिले.