खड्डे आणि धुळीविरोधात शिवसेनेचा भंडाºयात रास्ता रोको!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे आणि वाहनांमुळे उडणाºया धुळीच्या त्रासाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना धुळीच्या त्रासातून मुक्त करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौकात नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी दुचाकीस्वारांना मास्कचे वाटप करून रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. भंडारा शहरातील अंतर्गत रस्त्यांची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. विकासकामांच्या नावाखाली विविध ठिकाणी रस्ते खोदण्यात आले; मात्र खोदलेले रस्ते पक्क्या स्वरूपात पूर्ववत करण्यात आले नाहीत. परिणामी वाहनचालक, सायकलस्वार आणि पादचाºयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

यासंदर्भात शिवसेनेने नगर परिषद व जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शहरातील मिस्किन टँक ते पांडे महल, अण्णाभाऊ साठे चौक ते संताजी मंगल कार्यालय, राजीव गांधी चौक ते खात रोडदरम्यानची ट्युशन गल्ली, चांदणी चौक ते संताजी वार्ड तसेच मिस्किन टँक ते पोस्ट आॅफिस चौक या प्रमुख मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पक्के डांबरीकरण करण्याऐवजी केवळ गिट्टी व चुरी टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. काही दिवसांतच गिट्टी बाहेर निघाल्याने रस्त्यांची परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. या मार्गांवरून अवजड वाहने गेल्यानंतर धुळीचे मोठमोठे लोट उडतात. त्याचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वार आणि पादचाºयांना सहन करावा लागतो.

खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत असून काही नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी केला. धूळ आणि खड्ड्यांमुळे नागरिकांच्या मणक्याचे तसेच श्वसनाचे आजार वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. मागील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी शहराच्या विकासाबाबत मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र, नगरपरिषदेत सत्ता स्थापन होऊन जवळपास वर्ष उलटत असतानाही शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारलेली नाही. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांकडे सत्ताधाºयांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. घोषणाबाजी करीत मास्क वाटप आणि रास्ता रोको जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

‘नगरपरिषद मुदार्बाद’, ‘रस्त्यांवरील खड्ड्यांचा निषेध असो’, ‘शहरवासीयों के हित में शिवसेना मैदान में’ अशा घोषणांनी अण्णाभाऊ साठे चौक परिसर दणाणून गेला. यावेळी चौकातून जाणाºया दुचाकीस्वारांना धुळीपासून संरक्षण मिळावे यासाठी मास्कचे वाटप करण्यात आले.त्यानंतर शिवसेना पदाधिकाºयांनी चौकात ठाण मांडून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी उपस्थित पोलिस अधिकाºयांनी आंदोलनकर्त्या शिवसेना पदाधिकाºयांना ताब्यात घेऊन भंडारा पोलीस ठाण्यात नेले. शहरातील रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, खड्डे बुजवून धुळीचा प्रश्न निकाली काढावा आणि नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *