ठिय्या आंदोलनात शिक्षकांचे प्रश्न मार्गी; मुख्याध्यापकाचे आॅन द स्पॉट आदेश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने मंगळवारी शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात आनंद प्राथमिक शाळा जांब येथील शालिनी चिंधालोरे यांना प्रभारी मुख्याध्यापक पदाचे आॅन द स्पॉट आदेश देण्यात आले. कोमल गोमासे, कार्तिक राठोड व चंपत बोबडे यांचे पगार देण्याचे मान्य झाले. तसेच ३१ मार्च पासून वेतनेत्तर अनुदान वितरण झाले नाही. सभागृहात लक्षवेधी लावण्याचे अडबाले यांनी इशारा दिला. खाजगी माध्यमिक शाळा :गजानन उईके यांचे एक वर्षाचे थकीत वेतन काढणे, जीपीएफ खाते उघडणे तसेच वेतन देयकात नाव समाविष्ट असल्याशिवाय शाळेचे वेतन देयक मंजूर होणार नाही. कौशल्या नागपूरे यांचे दीड वर्षापासून प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरण एजी कार्यालयाला सादर करण्यात आले. उर्मिला बारापात्रे यांचे सेवानिवृत्ती प्रकरण सेवा हमी कायद्यानुसार निकाली काढण्यात येईल. तुळशीराम पिल्लेवार यांचे थकीत देयक मंजूर होईल, तर सुनीता बारई यांचे ग्रॅच्युइटी प्रकरण मंजूर करण्यात आले.

डी.के. कोलते पाटील शाळेतून अतिरिक्त झालेले लोकमान्य केवळराम प्रधान यांच्या १० महिन्याच्या वेतनासाठी डीडी कार्यालयाला आठ दिवसात अहवाल सादर करण्यात येईल. जय संतोषी माँ शाळेतील सिंधू गहाणे यांचा शालार्थ आयडी मंजूर करण्यात येईल.अतिरिक्त शिक्षकांना रुजू न करणाºया शाळातील पद व्यापगत करण्याची शिफारस करण्यात आली. जि.प. शाळा :- अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यक दिलीप चित्रीवेकर (जे.के. शाळा, भंडारा), रेखा बोरकर (जि.प. शाळा, वरठी), कमलेश बेले (जि.प. शाळा, देव्हाडी) यांचे वेतन दिवाळीपूर्वी द्यावे. जि.प. शाळेत बीएड झालेल्या तारखेपासून मुख्याध्यापक पदोन्नती कार्यवाही करावी, वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात ११ नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत. जि.प.च्या सर्व शिक्षक संघटनांची एकत्रित सभा घेऊन सभावृत्त कळवावे, असाही निर्णय झाला.

प्राथमिक शिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी निषेध नोंदवला. २८ सप्टेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार लोकप्रतिनिधींच्या सभेला अधिकारी उपस्थित राहणे बंधनकारक असताना शिक्षणाधिकारी उपस्थित झाल्या नाहीत. यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी मनिषा गजभिये, विमाशिचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश का.धुर्वे, धीरज बांते, टेकचंद मारबते, शमशाद सय्यद, अनंत जायभाये, बाळकृष्ण लंजे, मनोहर कापगते, विजय देवगिरकर, पुरुषोत्तम लांजेवार, श्रीधर खेडकर, पंजाब राठोड, भीष्म टेंभूर्णे, प्रभाकर मेश्राम, फारूक शहा, संजीव बावनकर, संजय आजबले, मुबारक सय्यद, ओमप्रकाश गायधने, अचल दामले, रवि नखाते आदी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *