आ.परिणय फुके यांची ‘पाड्यावरची दिवाळी’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : दिवाळीचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, प्रत्येकाच्या चेहºयावर आनंदाचे हास्य फुलावे आणि समाजातील सर्व घटकांमध्ये आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे, या सामाजिक भावनेतून आमदार डॉ. परिणय फुके यांनी सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्यातील विविध समाज वस्त्यांना भेट देत ‘पाड्यावरची दिवाळी २०२६’ हा विशेष उपक्रम उत्साहात साजरा केला. या उपक्रमांतर्गत आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा, लाखणी आणि साकोली तालुक्यांतील वंचित, भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजबांधवांच्या वस्त्यांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद वाटून घेतला.

या दौºयाची सुरुवात भंडारा तालुक्यातील गिरोला येथील वडार समाज वस्तीपासून झाली. त्यानंतर भिलेवाडा येथील बहुरूपी समाज वस्तीस भेट देऊन समाजबांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पुढे लाखणी तालुक्यातील पिंपळगाव येथील गोपाळ समाज वस्तीस भेट देत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. तसेच साकोली तालुक्यातील खैरलांजी वस्ती येथील भटके-विमुक्त व आदिवासी समाजबांधवांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सणाचा आनंद साजरा करण्यात आला.

दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि रोषणाईचा सण नसून माणुसकी, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्सव आहे. समाजातील अनेक घटक आजही विविध अडचणींना सामोरे जात आहेत. अशा बांधवांच्या वस्त्यांवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या आनंदात सहभागी होणे आणि त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.समाजातील प्रत्येक घटक हा आपल्या कुटुंबाचा भाग आहे. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. ‘नातं माणुसकीचं… सण आपुलकीचा!’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे चारही समाज वस्त्यांमध्ये आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. दिवाळीचा खरा प्रकाश तेव्हाच, जेव्हा समाजातील शेवटच्या घटकाच्या घरापर्यंत आणि चेहºयापर्यंत आनंद पोहोचतो!

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *