दुष्काळाच्या अंधारात चरण वाघमारे यांचा फुटाळावासीयांना आधार!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जंगलव्याप्त भागात वसलेल्या वाळा फुटाळा गावात यंदा दुष्काळाने ग्रामस्थांचे जगणे कठीण केले आहे. तलाव कोरडा, शेती उद्ध्वस्त, हाताला रोजगार नाही आणि घरात अन्नधान्याचा साठाही नाही. दिवाळीसारखा सण तोंडावर असताना आर्थिक संकटामुळे गावकºयांच्या घरात निराशेचे वातावरण होते. अशा कठीण परिस्थितीत गावकºयांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे धावून आले. जंगलव्याप्त आणि दुर्गम भागात असल्याने फुटाळा गावाकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यंदा पावसाअभावी गावातील फुटक्या तलावाने तळ गाठला असून तलावाच्या पात्रात मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.

सिंचनाचा दुसरा पर्याय नसल्याने शेतकºयांचे धानपीक पूर्णत: उद्ध्वस्त झाले. आधीच कर्जाच्या ओज्याखाली दबलेल्या शेतकºयांसमोर आता कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत चरण वाघमारे यांनी गावात सामूहिक गाव दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करून प्रत्येक कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचविला. गावातील प्रत्येक घरी चादर, ब्लँकेट, खाद्यतेल, साखर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचेवाटप करण्यात आले. केवळ वस्तूंचे वाटप करून ते थांबले नाहीत, तर संपूर्ण गावाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *