भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मागील वर्षीच्या धान बोनसची घोषणा तातडीने करून रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करावी, धानाला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये भाव द्यावा आणि शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाºयांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्य सरकारने २०२५-२६ या वषार्तील धान बोनस देण्याबाबतअधिवेशनात घोषणा केली होती. मात्र, दिवाळीचा सण जवळ आला असतानाही बोनसबाबत निर्णय जाहीर न झाल्याने शेतकºयांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे अलनिनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यवृष्टी, धान पिकांवरील रोगराई आणि घटणारे उत्पादन यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास विलंब होत असून, सुरूअसलेल्या केंद्रांवर शेतकºयांकडून प्रति पोते ४० रुपये हमाली आकारली जात आहे. तसेच ओलाव्याच्या नावाखाली प्रति पोते ४ ते ५ किलो धान कपात केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकारांकडे जिल्हा प्रशासन व पणन विभाग दुर्लक्ष करीत असल्याची टीका आंदोलकांनी केली. मोर्चादरम्यान ‘जुमलेबाज महायुती सरकार मुदार्बाद’, ‘बोनस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘धानाला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे’, ‘शेतकºयांची लूट बंद करा’, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.
