भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील भंडारा, पवनी, मोहाडी, तुमसर आणि लाखांदूर तालुक्यांत धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. मात्र, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकºयांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नसून, शासनाकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची नुकसानभरपाईही अनेक शेतकºयांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे पीक विमा आणि नुकसानभरपाईची रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, सचिव पुरुषोत्तम गायधने, उपाध्यक्ष व्यंकटराव गायधने, ज्ञानेश्वर आश्वले, राधेश्याम शेंडे, राजू थोटे आणि मोहित हटवार यांनी जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन पाठविले. सन २०२६-२७ या हंगामातील धान पिकाचा विमा शेतकºयांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत तसेच काही शेतकºयांनी स्वत: भरला आहे. मात्र, अद्याप शेतकºयांच्या हक्काची पीक विम्याची रक्कम विमा कंपनी व शासनाकडून देण्यात आलेली नाही. ही बाब अत्यंत दुदैर्वी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई अनेक शेतकºयांना अद्याप मिळालेली नसल्याने ती रक्कमही तातडीने शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी व समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
