धानाच्या पुंजण्याला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया कन्हारटोला येथे अज्ञात व्यक्तीने शेतात मळणीसाठी ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याला (ढिगाला) आग लावल्याची धक्कादायक घटना बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. या आगीत शेतकरी हिरदिलाल बिसेन यांच्या एक एकरातील धानाचे संपूर्ण पीक जळून खाक झाले. या घटनेमुळे शेतकºयाचे वर्षभराचे कष्ट आणि अपेक्षित उत्पन्न आगीत भस्मसात झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असून शेतकरी कापणी केलेल्या धानाची मळणी करण्यासाठी शेतात पुंजणे तयार करून ठेवत आहेत. त्यानंतर मळणी करून आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी नेले जाते.

याच पद्धतीने हिरदिलाल बिसेन यांनी आपल्या एक एकर शेतातील धान कापून मळणीसाठी ढीग लावून ठेवला होता. मात्र, अज्ञात व्यक्तीने या धानाच्या ढिगाला आग लावली. धान वाळलेले असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण धान पुंजणे जळून राख झाले. आगीत संपूर्ण पीक नष्ट झाल्याने बिसेन यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खचार्मुळे शेतकरी अडचणीत असताना अशा प्रकारच्या आगीच्या घटनांमुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडत आहे. या घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकºयाला तातडीने आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *