ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील देवरी येथील श्री अग्रसेन चौकात बुधवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शिवलाल फाफनवाडे रा. डवकीटोला असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवलाल फाफनवाडे हे बुधवारी सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास एमएच ३५ एम ५८६२ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना श्री अग्रसेन चौकाजवळ एमएच १४ केएल २२७७ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या अपघातात शिवलाल यांचा अक्षरश: चेंदामेंदा होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, अपघातानंतर चौकात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी झाली होती.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *