नागपुरात ‘रॅपिडो’ बाईक टॅक्सी सेवेला वाहतूक पोलिसांचा दणका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : नागपूर शहरात विनापरवाना सुरू असलेल्या ‘रॅपिडो’ बाईक टॅक्सी सेवेविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. आवश्यक परवानग्या नसतानाही खासगी दुचाकींचा व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याने या सेवेवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागपुरातील रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दररोज या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाºया सुमारे ६०० ते ७०० चालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर शहरात कमी वेळेत आणि परवडणाºया दरात इच्छित स्थळीपोहोचण्यासाठी अनेक विद्यार्थी आणि नोकरदार रॅपिडो सेवेचा वापर करत होते.

सीताबर्डी, धंतोली, धरमपेठ, सदर आणि मिहान यांसारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये या सेवेची मागणी अधिक होती. मात्र, आता वाहतूक शाखेने विनापरवाना बाईक टॅक्सीविरोधात जप्ती आणि दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो, आपली बस, अधिकृत टॅक्सी आणि आॅटो रिक्षा यांसारख्या पयार्यांचा आधार घ्यावा लागणार आहे.स्थानिकबातम्या शहरातील प्रवासी वाहतूक करणाºया वाहनचालक संघटनांनी अनधिकृत बाईक टॅक्सी सेवेमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली होती. या तक्रारींची दखल घेत वाहतूक शाखेने कारवाईचा निर्णय घेतला. ही सेवा कायमस्वरूपी बंद करण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले उचलली आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *