वाळलेल्या झाडाखाली प्रवाशांचा जीवघेणा प्रवास!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील नागपूर नाका परिसरात बस थांबा असला तरी प्रवाशांसाठी निवारा नसल्याने नागरिकांना उघड्यावर आणि रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडाखाली उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे, प्रवासी ज्या झाडाचा आधार घेतात ते झाड शंभर वर्षांहून अधिक जुने असून पूर्णपणे वाळले आहे. त्याच्या फांद्या कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर नाका येथील महामार्गावरील या ठिकाणी मोठे वाळलेले झाड रस्त्याच्या मधोमध उभे आहे. बसची प्रतीक्षा करताना महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवासी याच झाडाखाली आश्रय घेतात.

मात्र, झाडाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून त्याच्या फांद्या कोसळल्यास मोठीदुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना बसची प्रतीक्षा करतानाही जीव मुठीत धरावा लागत आहे. दरम्यान, या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून सुरू असून त्याची गती अत्यंत संथ आहे. ठिकठिकाणी खोदकाम, मातीचे ढिगारे आणि वाहतुकीसाठी डायव्हर्शन बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र, या कामादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरता निवारा किंवा सुरक्षित बस थांब्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी, उन्हात-पावसात प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *