जिल्ह्यात १ हजार ९ आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

ग्रामीण आरोग्यसेवेला मिळणार बळ

जिल्ह्यातील १९ आरोग्य संस्थांमध्ये सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा प्रशिक्षण

१३ प्रकारच्या आरोग्य सेवाबाबत अधिकारी, कर्मचारी व आशा सेविकांना मार्गदर्शन

आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा संकल्प

भंडारा जिल्ह्यात आरोग्य प्रशिक्षणाला वेग; ५५९ आशा सेविकांचा सहभाग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

भंडारा : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या संकल्पना व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भंडारा जिल्ह्यातील सर्व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा’ या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरे संपन्न होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संदीपकुमार गर्जभिये यांच्या हस्ते दि. १७ जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कुडेगाव येथे जिल्हास्तरीय उद्घाटन संपन्न झाले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संदीपकुमार गर्जभिये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अतुलकुमार टेंभुर्णे व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन चव्हाण, डॉ. हितेश तायडे रुग्णालयकीन प्रशिक्षण पथक प्रमुख यांच्या कुशल मार्गदर्शनात जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात हे सीएचएससी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर/आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या घरजवळच दजेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भंडारा जिल्ह्यात समग्र प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षणाला वेग आला आहे, जिल्ह्यात १७ जूनपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण सत्रांतर्गत आतापर्यंत भंडारा, लाखांदूर, लाखनी, पवनी, मोहाडी व भंडारा तालुक्यातील २ प्राथमिक आरोग्य केंद्रात १९ आरोग्य संस्थांमधील एकूण १००९ आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि आशा सेविका यांना यशस्वीरित्या प्रशिक्षण देण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बोदलकर यांनी दिली आहे.

पदनिहाय प्रशिक्षणार्थींची आकडेवारी

या विशेष प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील विविध संवर्गातील आरोग्य दूत सहभागी झाले होते. यामध्ये वैद्यकीय अधिकारी : ५५, समुदाय आरोग्य अधिकारी : ५९, आरोग्य सहायक : ३१, लेडी हेल्थ विजिटर : २६, स्टाफ नर्स : २६, आरोग्य सेविका : १२०, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी : ७३, क्लार्क फसिलिटेटर : २६, आशा स्वयंसेविका : ५५९, इतर आरोग्य कर्मचारी/अधिकारी : ३० या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.

पाच तालुक्यातील १९ आरोग्य संस्थांचा समावेश

जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी हे प्रशिक्षण टप्पاتप्प्याने राबवले जात आहेत, आतापर्यंत लाखांदूर तालुक्यातील ०४, लाखनी तालुक्यातील ०४ पवनी तालुक्यातील ०४ मोहाडी तालुक्यातील ०४ आणि भंडारा तालुक्यातील ०२ अशा एकूण १९ आरोग्य संस्थांचा यात समावेश आहे.

१३ प्रकारच्या विस्तारित आरोग्य सेवांचे प्रशिक्षण

या दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रात उपस्थितांना नागरिकांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी १३ प्रकारच्या विस्तारित आरोग्य सेवांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खालील घटकांचा समावेश होता, गर्भधारणा व बाळंतपणाची काळजी, नवजात व अर्भक आरोग्य सेवा, बाल व किशोरवयीन आरोग्य सेवा, कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य सेवा, संसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन (ट्युब.टी., डेंग्यू, मलेरिया), सामान्य व किरकोळ आजारांवरील उपचार, संसर्गजन्य आजारांची तपासणी व व्यवस्थापन (मधुमेह, उच्च रक्तदाब, फकरोग), नेत्र व कान-नाक-गसा सेवा, प्राथमिक मौखिक (तोंड व दात) आरोग्य सेवा, मानसिक आरोग्य सेवा, वृद्ध व पलिएटिव्ह (निरामय) आरोग्य काळजी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा व भाजणे/ट्रमा काळजी, योग व आरोग्य संवर्धन यावर प्रशिक्षण देण्यात येत आहे.

पर्यावरण पूरक उपक्रम: आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण डॉ. हितेश तायडे रुग्णालयकीन प्रशिक्षण पथक प्रमुख व डॉ. विवेक बोदलकर जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या अभिनव संकल्पनेतून या प्रशिक्षणाला पर्यावरणाची जोड देण्यात आली. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सीएचएससी प्रशिक्षण आयोजित केले जात आहे, त्या सर्व ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. आरोग्यासोबत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा हा संदेश उपस्थितांना प्रेरणा देणारा ठसरत आहे.

तज्ज्ञ मार्गदर्शकांचे लाभत आहे सहकार्या : या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा प्रशिक्षण पथक भंडारा यांच्या वतीने डॉ. हितेश तायडे रुग्णालयकीन प्रशिक्षण पथक डॉ. विवेक बोदलकर पै.आ.डॉ. नरेंद्र नौकरकर, डॉ. जांभुलकर, डॉ. अनम बामडे, डॉ. शुभम निखाडे, डॉ. मीनाक्षी सावरकर, रुग्णालयकीन आरोग्य कर्मचारी चंदा चारमोडे (झक्के), कविता चोपकर, मुकेश काटणे, लता पांडुबुचे, निखिलेश कावळे यांनी विविध आरोग्य विषयावर आरोग्य कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे रूपांतर आयुष्मान आरोग्य मंदिरात केल्यानंतर, तेथील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण उपचार पोहोचण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण अत्यंत महत्वपूर्ण मानले जात आहे.

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत दजेदार आरोग्यसेवा पोहोचविणे हे या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. त्यात आरोग्याच्या आधुनिक उपचार पद्धती, आरोग्यविषयक सखोल माहिती सत्र, प्रभावी संवाद कौशल्ये विकसित करणे, वेळेत व परिणामकारक उपचार उपलब्ध करणे, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व योजनांची माहिती, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा बाबत सखोल मार्गदर्शन आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांना देण्यात येत असल्याचे माहिती सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन चव्हाण यांनी दिली आहे. ग्रामीण स्तरावर आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी आणि दजेदार आरोग्य सेवा सुविधा पुरविण्यासाठी फिल्ड लेव्हलवर या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, या प्रशिक्षणामुळे गाव पातळीवरील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अतुलकुमार टेंभुर्णे यांनी दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *