भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : न्यायालयाचे दरवाजे आज उघडले, पण आत न्याय नव्हता… होता फक्त संताप! सुधारित वेतनश्रेणीच्या हक्कासाठी महाराष्ट्रभर पेटलेल्या आंदोलनाची ठिणगी मोहाडीतही भडकली आहे. मा. उच्च न्यायालयातील कर्मचाºयांना मिळणारी सुधारित वेतनश्रेणी, दुय्यम न्यायालयातील कर्मचाºयांना का नाही? हा एकच सवाल घेऊन मोहाडी येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर (खटऋउ) न्यायालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर आहेत. “चार संघटना – एकच निर्धार!” “समान काम – समान वेतन!” ही मागणी मोहाडी न्यायालयाचा परिसरात कर्मचाºयांनी घोषणा व फलक लावून केली आहे. जोपर्यंत हक्क मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा ठाम पवित्रा कर्मचाºयांनी घेतला आहे.
संपात सहभागी झालेले सहाय्यक अधीक्षक आर.एम.गोस्वामी, लघुलेखक जे. टी. काटेखाये, वरिष्ठ लिपीक डी.जी.सोनवाने आणि एम.ए.कानतोडे, कनिष्ठ लिपीक सौ.जे.ए.जूमडे, सौ.टी. एन. शेंडेकर, सौ.पि.के.बाहेकर,कु.एस.बी. मेंढे आणि श्रीमती ए.आर.खापर्डे, बेलीफ एन. जी.गोन्नाडे,सौ.एम.एन.बडवाईक आणि के.के.चापरे, शिपाई एस.एच.वैद्य आणि एस.आर.मेंढे, पहारेकरी एस.पी.दुधबळे, सफाईगार एस.डी.सोमनाथे साहाय्यक अधीक्षकांपासून ते सफाईगारापर्यंत एकही कर्मचारी कामावर नाही, त्यामुळे मोहाडी न्यायालयाचं दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झालं आहे. फाईल्स अडकल्या, तारखा लांबल्या, आणि दूरदूरवरून न्यायाच्या आशेने आलेले पक्षकार, वकील आणि नागरिक हताश होऊन परतत आहेत. न्याय मिळवून देणाºयांनाच आज न्यायासाठी लढावं लागतंय, हीच खरी शोकांतिका. आता प्रश्न एकच… शासन या आंदोलनाची दखल घेणार का? की न्यायालयीन कर्मचाºयांचा हा लढा आणखी तीव्र होणार? सर्वांचे लक्ष शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
