आदमखोर बिबट्याला पकडल्याचा वनविभागाचा दावा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील अप्पर तहसील अड्याळ अंतर्गत तिर्री (मिंसी) गावात सहा महिन्यांच्या चिमुकल्या आद्विक अभिमन बोंद्रे याचा जीव घेणाºया बिबट्याला अखेर वनविभागाने पिंजºयात कैद केल्याचा दावा केला आहे. बिबट्या पकडल्यामुळे गावासह परिसरातील नागरिकांनी काही प्रमाणात सुटकेचा श्वास घेतला असला, तरी भीती अद्याप कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता वनविभागाच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी तिर्रीशेगाव डोंगराजवळ बेहड्याच्या झाडाखाली पिंजरा लावण्यात आला होता. हे ठिकाण बिबट्याने सहा महिन्यांच्या आद्विकवर हल्ला करून त्याचा जीव घेतलेल्या ठिकाणापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर आहे. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता वनविभागाचे कर्मचारी पिंजºयाची पाहणी करण्यासाठी गेले असता बिबट्या त्यात कैद झाल्याचे आढळले. ही माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. बिबट्या पकडल्यामुळे ग्रामस्थांमधील भीतीचे वातावरण काही प्रमाणात कमी झाले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *