भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाºया दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधारात उतरविल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेत त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाºयांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणात संबंधित चालक आणि वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी भंडारा आगाराच्या एसटी बसमधून प्रवास करणाºया दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी रोहा येथे अंधारात बसमधून उतरविण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेची बातमी स्थानिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर प्रवाशांच्या, विशेषत: महिला व बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या घटनेची दखल घेत एसटी प्रशासनाने तातडीने प्राथमिक चौकशी सुरू केली. भंडारा विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली. या चौकशीत संबंधित बसचे चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानुसार दोघांनाही दि. १६ नोव्हेंबर २०२६ पासून एसटी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच एसटी महामंडळाच्या शिस्त व अपील कार्यपद्धतीनुसार त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी एसटी कर्मचाºयांनी प्रवाशांशी संवेदनशीलतेने वागावे. विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याची जबाबदारी एसटी कर्मचाºयांची आहे. त्यामुळे एसटी कर्मचाºयांनी आपल्या मुलांप्रमाणेच प्रवास करणाºया बालकांची काळजी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात आवश्यक परिपत्रकीय सूचना तातडीने निर्गमित करण्याचे निर्देशही त्यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
प्रवाशांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य!
प्रवाशांचा सुरक्षित प्रवास ही एसटी महामंडळाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. विशेषत: महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. कर्तव्यात कसूर करणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाईही केली जाऊ शकते, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
