कर्जाच्या ओज्यातून मुक्ती; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेने शेतकºयांना दिला दिलासा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शेती हा ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी नापिकी, तर कधी अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडणे शेतकºयांसाठी मोठे आव्हान ठरते. आर्थिक अडचणींमुळे कर्जाची परतफेड करू न शकलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’मुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेचा लाभ मिळाल्याने कर्जाच्या ओज्यातून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना लाभार्थी शेतकºयांनी व्यक्त केलीआहे. भंडारा तालुक्यातील दाभा येथील भावेश गायधने यांच्याकडे केवळ एक एकर शेती आहे. त्यांनी २०१९-२० मध्ये शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र, नापिकीमुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही आणि त्यामुळे त्यांना कजार्ची संपूर्ण परतफेड करणे शक्य झाले नाही.

आर्थिक विवंचनेत असताना सन २०२६ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या माध्यमातून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला. या मदतीमुळे मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे सांगत त्यांनी शासनाचे आभार मानले. दाभा येथील दिनेश रामुजी लांबट यांच्याकडे तीन एकर शेती आहे. शेतीतील नुकसान आणि उत्पन्नात झालेली घट यामुळे त्यांना घेतलेल्या कजार्ची वेळेत परतफेड करता आली नाही. कर्जफेडीची चिंता सतावत असतानाच शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ त्यांनामिळाला. त्यामुळे आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या दिलासादायक निर्णयाबद्दल त्यांनी शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर, दाभा येथील संजय उद्धवजी लंबट यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे.

मात्र, पुरामुळे त्यांची शेती पाण्याखाली गेली आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातात अपेक्षित उत्पन्न न आल्याने शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याने त्यांना मोठा आधार मिळाला. शासनाच्या या मदतीबद्दल त्यांनी मन:पूर्वक आभार मानले. नापिकी, पूर आणि शेतीतील नुकसानीमुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या या शेतकºयांसाठी शासनाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना केवळ आर्थिक मदत ठरलेली नाही, तर नव्याने उभे राहण्याचा विश्वास देणारी ठरली आहे. शेतकºयांच्या अडचणीच्या काळात शासनाने दिलेला हा मदतीचा हात त्यांच्या चेहºयावर समाधान फुलविणारा ठरत आहे. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत २३ हजार ६५८ थकीत शेतकºयांना तब्बल १५७.३५ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून सदर रक्कम संबंधित शेतकºयांच्या बँक कर्ज खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *