शिबिरातून सामाजिक बांधिलकी जोपासली- आ. नाना पटोले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मेळाव्याद्वारे महात्मा ज्योतीबा फुले सब्जी मार्केट असोसिएशनने फक्त उत्सव साजरा केले नाही, तर समाजातील एकजूट, आरोग्यसेवा आणि सामाजिक जबाबदारी यांचा संदेशही देणारा आहे. खर म्हणजे शेतकºयांच्या हितासाठी कणखर भुमिका घेऊन सदैव उभे राहणारे महात्मा ज्योतीबा फुले सब्जी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे व पदाधिकारी यांच्या अभिनंदन करणे आवश्यक आहे. जी वास्तु ज्या कामाकरिता देण्यात आली आहे. त्याचा वापर होणे आवश्यक आहे. जर कुणी जनावरे बांधत असेल. तसे शौचालयाचे पैसे मोजावे लागत असेल तसेच शेतकºयांच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रयत्न करत असेल त्याला आम्ही हाकलून लावू. ही जागा कुण्या एकट्याच्या बापाची नाही.

या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचे फलक लावावे. व पुढल्या वर्षी महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्यात येणार आणि अशाप्रकारच्या उपक्रमात शेतकरी स्नेहमेळाव्यात शेतकºयांनाचा सन्मानाबरोबर रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असे प्रतिपादन आमदार नाना पटोले यांनी केले. ते दिवाळीच्या शुभसंध्येला महात्मा ज्योतीबा फुले सब्जी मार्केट असोसिएशन भंडाराच्या वतीने शेतकरी स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते. शेतकरी स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी खासदार सुनील मेंढे, आमदार राजू कारेमोर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे, अंकुश वंजारी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आसु गोंडाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष भगिरथ धोटे, सदानंद ईलमे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, रोशन उरकुडे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुर्यकांत ईलमे, नगर परिषद सदस्य बल्लीभैय्या, सुनिता उपरिकर, नितीन गायधने, शैलेश खरोले, शैलेश मेश्राम, सचिन कुंभलकर, कृषी विभागाचे पद्माकर गिदमारे, संजय मते, अग्रवाल, ममता दलाल, देखरेख समितीचे अध्यक्ष सुखराम अतकरी, धनंजय बिरवार, पांडे, विजय सुर्यवंशी, रामलाल बोंद्रे, रामेश्वर कांबळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबास- ाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यापुर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत येणाºया जिल्हा सामान्य रुग्णालय व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असोसिएशनच्या वतीने जिल्हयातील शेतकºयांसाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्या रक्तदान शिबिरात १५ विविध व्यावसायिक, शेतकरी आणि कामगारांनी रक्तदान करून मानवतेचा उज्वल संदेश दिला. शेतकरी बांधवांशी विविध मार्मिक उदाहरण देऊन सविस्तर पणे स्नेहसंवाद साधण्यात आला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाºया शेतकºयांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले असोसिएशनच्या या उपक्रमातून दिवाळीच्या प्रकाशात सामाजिक बांधिलकी, आरोग्य जागरूकता, शेतकरी ऐक्य आणि मानवतेचा संदेश दिला गेला. शेतकरी बांधवांनी सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे त्यांचा उत्साह वाढतो, समाजाशी जुळाव मजबूत होतो. आरोग्याबाबत जागरूकता वाढत असते असे मत प्रगतशील शेतकरी जितेंद्र ढेंगे यांनी व्यक्त केले.

कुठल्याही वास्तुला जिवंत व्यक्तींचे नाव देता येत नाही. मात्र एका अतिशय बुध्दीमान माणसाने स्वत: चे नाव दिले आहे. हे कायदेशीर चुकीचे आहे. त्या व्यक्तीने शासनाची दिशाभुल केली आहे. असे मत जिल्हाध्यक्ष आसु गोंडाणे यांनी व्यक्त केले. काहींनी नगर परिषदेची फसवणूक केली आहे. मात्र आम्ही शहरवासी व शेतकºयांचा हित जोपासण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले या नावाचा ठराव पारित केला आहे. असे मत माजी खासदार सुनील मेंढे यांनी केले. सर्वात म्हत्वाचे म्हणजे आपण शेतकºयांचे मुले आहोत. आमचा संबंध भुमातेशी आहे. आज आपल्या नशीबाने विविध ठिकाणी कार्यरत आहेत. आमच्या शेतकºयांच्या केसाला पुढे धक्का लागला तर त्याला त्याची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही. असे प्रखर मत खासदार प्रशांत पडोळे यांनी केले.

उपस्थितांनी मार्गदर्शन करत या कार्यक्रमाची खूप प्रशंसा केली आणि पुढील वर्षी महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असोसिएशन अधिक व्यापक स्वरूपात उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शेतकरी बांधवांसाठी आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला आणि उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल दिघोरे व प्रास्ताविक महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जितेंद्र ढेंगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता असोसिएशनचे उपाध्यक्ष क्रिष्णा उपरीकर, शशिकला भेदे, दक्षिणा मेंढे, बबलू खान, शेखर भाईक, सुचिता नागरीकर, शशिकला भेदे, आयुष नागरिकर, सुरेश साखरकर, आसिफ शेख, दामोदर गोटेफोडे, कमलेश भेदे, जितेंद्र ढेंगे, विलास केजरकर, आकाश कटनकर, धर्मेंद्र भोंडेंकर, रवि बोरकर, नागेश ताईतकर, समीर निंबार्ते, प्रमोद हजारे, बंटी धकाते, वृषभ मुटकुरे, अक्षय ईळपाते, गोल्डी शेख, सुखराम अतकरी, रिमा पटेल, सुरेश कटनकर, राहुल घडोले, रोशन गुरनुले व

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *