भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : मंडईनिमित्त लाखांदूर शहरात पारंपरिक कला, संस्कृती आणि लोकपरंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. मंडईच्या उत्साहात बँड आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी लाखांदूर शहरातून मुला-मुलींनी आकर्षक पारंपरिक वेशभूषेत गोंडी नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या तालावर पारंपरिक गोंडी नृत्याच्या ठेक्यांवर थिरकणाºया बालकलाकारांनी मंडईच्याउत्सवात विशेष रंगत आणली. यासोबतच पवनी येथील मुलांनी मर्दानी खेळ अर्थात आख- ाड्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. विविध पारंपरिककसरती, शारीरिक कौशल्य आणि धाडसी खेळांचे प्रदर्शन पाहून उपस्थितांनी मुलांचे कौतुक केले. या मदार्नी खेळांमधून पारंपरिक आखाडा संस्कृती आणि शौर्याच्या परंपरेचे दर्शन घडले.
गोंडी नृत्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन, तर मर्दानी खेळांच्या माध्यमातून शौर्य आणि क्रीडा परंपरेचा वारसा जपण्याचा सुंदर प्रयत्न या मंडईत पाहायला मिळाला. या सादरीकरणांमुळे मंडईच्या उत्सवात विशेष आकर्षण निर्माण झाले. (छायाचित्र : अभिमन ठाकरे, लाखांदूर)
