भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महावितरणच्या २०२६-२७ च्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाने वर्चस्व गाजवत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. तर पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघाना स्पधेर्तील उपविजेतेपद विभागून देण्यात आले. यावेळी महावितरणचे संचालक राजेंद्र पवार (मानव संसाधन) व कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे(भा.प्र.से) यांच्या हस्ते अजिंक्यपदाचा करंडक विजेत्या संघास देण्यात आला. महावितरणच्या कोल्हापूर येथे दि.२१ नोव्हेंबरपासून साधेपणाने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप मंगळवारी (दि. २४) सायंकाळी पोलीस ग्राऊंड, कसबा बावडा येथे झाला.
यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, नागपूर प्रादेशिक संचालक (प्रभारी) राजेश नाईक, मुख्य अभियंते पंकज तगलपल्लेवार, धर्मराज पेठकर, दत्तात्रय बनसोडे, दिलीप दोडके, संजय पाटील, हरीश गजबे, अरविंद बुलबुले, स्वप्नील काटकर, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या १६ परिमंडलाच्या संयुक्त आठ संघातील १२४६ खेळाडूपैकी ४०१ महिला व ८४५ पुरुष खेळाडू सहभागी झाले होते. स्पधेर्तील सांघिक व वैयक्तिक विजेते व उपविजेत्यांना करंडक व सुवर्ण/रौप्य/ कांस्य पदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले. सूत्रसंचालन रामगोपाल अहिर, बाजीराव आबिटकर व सुरेश पाटील यांनी केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी आभार मानले.
